ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात बेपत्ता झालेले कॅप्टन जयंत जोशी यांचा 18 दिवसानंतरही शोध लागला नाही. 3 ऑगस्ट रोजी लष्कराच्या एएलएच ध्रुव या वेपन सिस्टमसहीत हेलिकॉप्टरने पंजाबच्या पठाणकोटहून उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कठुआच्या रंजीत सागर धरणात कोसळल होते. या अपघातात बेपत्ता झालेल्या कॅप्टन जोशी यांचा 18 दिवसांच्या शोधमोहिमेनंतरही शोध न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांचा संयमाचा बांध फुटला.









