मुंबई/प्रतिनिधी
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला पवारांनी दिला होता. यांनतर पुन्हा शुक्रवारी रज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.तसेच, यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर टीका केली. त्यामुळे आता जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असं एका मुलाखतीत म्हंटलं होत. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. हा वाद आता शिगेला पोहोचला असून या वादात आता दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच. महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच.”