सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील तळेवाडी ता. आटपाडी येथे दूध भेसळप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ही कारवाई केली. कारवाईत ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी दिली.
तळेवाडीतील जनसेवा दूध संकलन केंद्रावर गाय आणि म्हशीच्या दुधात भेसळ होत असल्याचा संशय होता. त्यानुसार छापा टाकला असता त्या ठिकाणी भेसळीसाठी वापरण्यात येणारे पदार्थ आढळले. अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले. तसेच दूध साठा नष्ठ केला.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री.म.पवार, केदार व नमुना सहायक कवळे यांनी केली आहे. वरील सर्व अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानतंर त्यावर पुढील कारवाई घेण्यात येणार आहे. ग्राहकांना अन्न पदार्थाच्या गुणवत्ते विषयी काही तक्रार असल्यास अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु.आ. चौगुले यांनी केले आहे.
Previous Articleसेन्सेक्सची 300 अंकांची घसरण
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ६ मृत्यू, १९७ नवे रुग्ण








