ऑनलाईन टीम / मुंबई :
मंत्रालयाच्या गेटसमोर एका तरुणाने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालय परिसरातील पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकाराने मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव अथवा त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची माहिती अद्याप समोर आली नाही.









