लाल सलामीने दुमदुमला रेल्वे स्थानक परिसर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
यंत्रमाग कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावणारे व साडे तीन वर्षे या एका विधेयकावर विधानसभा डोक्यावर घेणारे महाराष्ट्रातील एकमेव कामगारांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या 25 वर्षाच्या अविरत पाठपुराव्याला व लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या लढ्याला यश आले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई येथील यंत्रमाग उद्योग चालणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समक्ष घेण्यात आलेल्या बैठकीत केली. हे स्वागतार्ह बाब आहे.
याकामी महाराष्ट्र विधिमंडळात प्रथम यंत्रमाग कामागर कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची संकल्पना मांडणारे आडम मास्तरांच्या तब्बल 25 वर्षाच्या पाठपुराव्याला आज न्याय मिळाला.याचे औचित्य साधून गुरुवार दिनांक सकाळी 6.:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यंत्रमाग कामगार व माकप च्या निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितत स्वागत सत्कार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकवर लाल झेंडे, घोषणा आणि गुलाल उधळून पुष्पहार घालून ढोल ताशांच्या गजरात जंगी व जोशपूर्ण वातावरणात स्वागत केले.
यावेळी पक्षाचे जिल्हासचिव अँड.एम.एच.शेख,नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसूफ शेख मेजर, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी,वसीम मुल्ला,रंगप्पा मरेड्डी, विक्रम कलबुर्गी, विल्यम ससाणे,बापु साबळे, अशोक बल्ला,दीपक निकांबे, अनिल वासम, किशोर मेहता,लक्ष्मण माळी, बाबुराव कोकणे,अकील शेख,दाऊद शेख,नरेश दुगाने, शहाबुद्दीन शेख,बाळासाहेब मल्याळ, विजय हरसुरे, नागेश म्हेत्रे,शाम आडम,शिवा श्रीराम आदींसह शेकडो कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









