नवी दिल्ली
रिलायन्सचा जिओफोन नेक्स्ट हा फोन ग्राहकांना येत्या काळात उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत. प्राप्त अहवालानुसार सदरच्या फोनमधील काही फिचर्स व्हायरल झाल्याची माहिती आहे. यामध्ये नवा फोन 5.5 इंच आकाराच्या डिस्प्लेचा असणार आहे. तसेच स्मार्टफोन अँड्रॉईड 11 गो एडिशनवर काम करणार आहे. यात दोन स्टोरेजचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे. 4जी व्हीओएलटीई कनेक्टिव्हीटी सपोर्ट मिळणार आहे. येणाऱया 10 सप्टेंबर रोजी फोनची किमत समोर येणार असून याच्या विक्रीसंदर्भात कंपनीने कोणताही खुलासा केला नसल्याची माहिती आहे. जिओफोन नेक्स्टची किमत ही 3,499 रुपये राहणार असल्याचा अंदाज असून फोनची विक्री 10 सप्टेंबर रोजी सुरु होण्याची शक्यता अहवालानुसार व्यक्त केली जात आहे.









