बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारी नवीन कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. सोमवारच्या तुलनेत राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात मंगळवारी १,२९८ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. याच वेळी राज्यात १,८३३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर कोरोनामुळे राज्यात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या २१,४८१ आहे.
दरम्यान, १,२९८ नवीन रुग्णांसह राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २९,३१,८२७ झाली आहे. यापैकी २८,७३,२८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण ३७,०३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक ३४० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याचवेळी शहरात ४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसासाठी सकारात्मकता दर १.०१ टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) २.४६ टक्के होता.