दोडामार्ग – वार्ताहर :
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2020 या सत्राचा गायन -वादन -नृत्य संगीत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून एकूण 114 परीक्षार्थी पैकी 106 परीक्षार्थी उत्तीर्ण होऊन 93% निकाल लागला आहे. ही परीक्षा दोडामार्ग केंद्रा अंतर्गत झाली होती.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गायन – हार्मोनियम:- प्रारंभिक प्रथम श्रेणी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रवेशिका प्रथम :-प्रथम श्रेणीत 19 विद्यार्थी तर विशेष योग्यता रेवा गवस, हर्षद गवस हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रवेशिका पूर्ण :- प्रथम श्रेणी 1 व तृतीय श्रेणी 6 विद्यार्थी. तर मध्यमा प्रथम :-प्रथम श्रेणी 1 द्वितीय श्रेणी 1, मध्यमा पूर्ण :-प्रथम श्रेणी 3 द्वितीय श्रेणी 1, विशारद प्रथम :-द्वितीय श्रेणीत 3 विशारद पूर्ण :–प्रथम श्रेणी 1 व द्वितीय श्रेणीत 1

तबला वादन परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रारंभिक :-प्रथम श्रेणी चार ,द्वितीय श्रेणी चार ,तृतीय श्रेणी दोन ,विशेष योग्यता गौरव देसाई व आदेश खानोलकर यांना मिळाली आहे. प्रवेशिका प्रथम :–प्रथम श्रेणी सहा, द्वितीय श्रेणी पाच , विशेष योग्यता तेजस सावंत व अनिकेत मिस्त्री यांनी मिळविली आहे.
प्रवेशिका पूर्ण:– प्रथम श्रेणी 5, द्वितीय श्रेणी 1, तृतीय श्रेणी 3 .विशेष योग्यता अथर्व मराठे याने मिळविली आहे. मध्यमा प्रथम :–प्रथम श्रेणी 2, द्वितीय श्रेणीत 2,
मध्यमा पूर्ण :–प्रथम श्रेणी- एक, विशारद प्रथम तृतीय श्रेणी एक व विशारद पूर्ण :–प्रथम श्रेणी 2.
नृत्य विषयाचा निकाल पुढील प्रमाणे.
प्रारंभिक ते मध्यम सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असून विशारद प्रथम व विशारद पूर्ण विद्यार्थी पुढील सत्रात बसण्यास पात्र ठरलेले आहेत.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र स्वर ताल संगीत विद्यालय दोडामार्गच्या वतीने तसेच राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ धाटवाडी यांनी अभिनंदन केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकासाठी येत्या 21, 22 , 28 ऑगस्ट 2021 रोजी आपले निकाल पत्रक कार्यालयीन वेळेत येऊन घेऊन जाणे असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात आले आहे









