ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा आपला अंकूश प्रस्तापित केला असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी, उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी देश सोडला आहे. याचबरोबर अनेक नेत्यांनी अफगाणिस्तान सोडले आहे. आणि जनता मात्र जीवनभर कमावलेल्या पुंजीचा विचार न करता जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळत असल्याचं भयानक चित्र आहे. अशी पार्श्वभूमी असताना चीनने मात्र तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.” मात्र तालिबानचे नागरिक जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. कारण यापूर्वी त्यांनी तालिबानी शासन अनुभवले आहे. यामुळे चीनच्या या भुमिकेवर जगभरातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे उत्सूकतेचं ठरणार आहे.