नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला चढवल्याने शिलाँग आणि मेघालयच्या काही भागातली परिस्थिती चांगलीच चिघळली आहे. आत्तापर्यंत कोणतीही हानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली तर शिलाँगच्या काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर चार जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली आहे.
चेरिस्टल फिल थांक्यू या दहशतवाद्याचा १३ ऑगस्टला पोलीस चकमकीत मृत्यू झाला. काल त्याच्या पार्थिवाचं दफन झाल्यानंतर ही हिंसा भडकली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मेघालयचे गृहमंत्री लहकमान रिंबुई यांनी राजीनामा दिला आहे.
हिंसक घटनांनंतर शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशात असे म्हटले आहे की 17 ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू लागू राहील.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









