बेळगाव
श्रावण महिन्याच्या पहिल्या सणानिमित्त म्हणजे नागपंचमीनिमित्त कपिलेश्वर मंदिरामध्ये कलाकंदचा वापर करून शिवलिंग साकारण्यात आले आहे. यासाठी 65 किलो कलाकंद वापरण्यात आला आहे. ही आरास मंदिराचे सेवेकरी सतिश आनंदाचे यांनी साकारली आहे. त्यासाठी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, ओमकार पोटे, तानाजी मुतकेकर, आकाश देवकर, यशवंत राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले.









