बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याने निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांना शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीसाठी आवश्यक तयारी झाली नव्हती, घिसाडघाईने निवडणुका जाहीर झाल्याने अधिकाऱयांना विविध सूचना आणि प्रशिक्षण देण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत महापालिका विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करून विविध सूचना केल्या. तसेच आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक चार वॉर्डला एक निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी निवडणूक अधिकारी साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांसह कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मनपा प्रशासक, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱयांना मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रिया कशी हाताळावी तसेच यामध्ये निर्माण होणाऱया अडचणींबाबत विविध माहिती अधिकाऱयांना देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवेळी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे, अशी सूचना अधिकाऱयांना केली. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी आदी सूचना करण्यात आल्या.
यावेळी महापालिकेच्या प्रभारी सामान्य प्रशासन उपायुक्त, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, कौंन्सिल सेपेटरी कंठी आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.









