एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
टी. व्ही. सेंटर परिसरातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून पाऊण लाखांचा ऐवज पळविला आहे. शुक्रवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आनंद गोडची यांनी फिर्याद दिली आहे. आनंद हे गुरूवारी आपल्या घराला कुलुप लावून कुटुंबियांसह गावी गेले होते. शुक्रवारी सायंकाळी घरी परतले त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी त्यांच्या घरात प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.
कपाटातील 15 ग्रॅमचे दागिने, आठ हजार 500 रुपये रोख रक्कम असा सुमारे पाऊण लाखांचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलीस पुढील तपास कीरत आहेत.









