प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील करंजे, गोडोली, सदरबजार, मंगळवार पेठ या भागात डेंग्यूची प्रमाण वाढले आहे. या भागात डेंग्यूची साथ असून अनेकजण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाकडून साथीच्या आजाराने आजारी असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे आला असून शनिवारी या परिसरात पालिका आणि हिवतपास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व्हे करण्यात येणार आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाच धुर फवारणी मशिन सध्या बंद आहेत. त्यामुळे पाच मशिनच्या सहाय्याने धुर फवारणी सुरु आहे.
सातारा शहरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जेथे जेथे पावसाचे पाणी साठून राहिले होते त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाल्याने डेंग्यूच्या साथीचा विळखा सातारा शहराला पडू लागला आहे. शहरातील करंजे, गोडोली, सदरबाजार आणि मंगळवार पेठेत प्रामुख्याने ही साथ मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत. बाधित रुग्ण हे प्रामुख्याने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने त्या त्या रुग्णालयाकडून रुग्णांची माहिती ही आरोग्य विभागाकडून जिल्हा हिवताप कार्यालयाला शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आाr आहे. शहरात सदरबाजार, मंगळवार पेठ, करंजे आणि गोडोली या चार भांगात डेंग्यूचा उपद्रव वाढू लागला आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. दरम्यान, जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने आणि पालिकेच्यावतीने शनिवारीपासून सर्व्हे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे पाच धुर फवारणी मशिन बिघाडलेल्या
शहरात ज्यावेळेस धुर फवारणीची गरज आहे. त्याच वेळेस सातारा पालिकेच्या पाच धुर फवारवणीच्या मशिन बंद पडलेल्या आहेत. पाच मशिन सुस्थितीत असून त्या मशिनच्या सहाय्याने प्रभाग क्रमांक 1 ते 5 मध्ये धुर फवारणी सुरु आहे.
पोलीस वसाहत व जुना दवाखाना परिसरात वाढलेले गवत देतेय डास वाढीला निमंत्रण
जिल्हा कारागृहाच्या पाठीमागे असलेल्या पोलीस वसाहत आणि गुरुवार पेठेतील गुरुवार पेठ मश्जिदपाठीमागील जुना दवाखान्याच्या पाठीमागे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱयांची वसाहत आहे. त्या वसाहतीत अस्वच्छता निर्माण झाल्याने साथ रोग उदभवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








