वृत्तसंस्था/ माँट्रियल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माँट्रिकल खुल्या हार्डकोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेत टय़ुनिशियाच्या जेबॉरने द्वितीय मानांकित आणि विद्यमान विजेती बिनाका ऍन्डेस्कूला पराभवाचा धक्का देत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला.
जेबॉरने ऍन्ड्रेस्क्मयूचा 6-7 (5-7), 6-4, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अलीकडेच अरब महिला टेनिसपटू जेबॉरने बर्मिंगहॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात टॉप सीडेड बेलारुसच्या सॅबेलिनेकाने कॅनडाच्या मॅरिनोचा 6-1, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. सॅबेलिनेकाचा उपांत्य फेरीतील सामना अझारेन्काशी होणार आहे. अझारेन्काने इटलीच्या सॅकेरीवर 6-4, 3-6, 7-6 (7-2) अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. चौथ्या मानांकित प्लिस्कोव्हाने अनिसीमोव्हाचा 6-1, 7-6 (10-8) असा पराभव केला. स्पेनच्या सोरिबेसने झेकच्या सिनियाकोव्हाचा 6-7 (4-7), 6-0, 6-3 तसेच इटलीच्या गिरोगीने झेकच्या क्विटोव्हाचा 6-4, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे.









