वलसंग(जत) / वार्ताहर
दरीबडची (ता.जत) येथील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिलीप महादेव वाघे .(वय.२६ )असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरीबडची सिद्धनाथ हद्दीलगतच्या वनविभागातून जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दिलीपचा मृतदेह मोटर सायकलीवर आढळून आला आहे. या घटनेने दरीबडचीत खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील जयश्री टिळक नरळे यांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पोलिसात संशयास्पद मृत्यू अशी नोंद आहे.व्हिसेरा राखून ठेवला आहे .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दिलीप वाघे हा मूळचा आसंगी -जत येथील मूळचा रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी दरीबडची – तिल्याळ रस्त्यालगत जमीन घेऊन राहिले होते. शुक्रवारी सकाळी दरीबडची सिद्धनाथ फॉरेस्ट हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर दिलीप वाघे या तरुणाचा मृतदेह दिसून आला. दिलीपचा मृत्यू मोटरसायकल वरून पडून अपघातात झाला आहे. असे भासवण्यात आले आहे . वाळूच्या स्पर्धेतून केला असावा अशीही घटनास्थळी चर्चा सुरू होती. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिस पाटील नरळे यांना दिली .त्यांनी याबाबतची पोलिसांना दिली. ही घटना गुरुवारी रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज केला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी १० संशयितांना ताब्यात घेतले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








