मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या आहेत. बुधवारी (११ऑगस्ट) रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने या परिसराची तपासणी केली. संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर सीआयएसएफला घटनास्थळावरुन बाटल्या सापडल्या. गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरून काही वस्तू भिरकावल्याचे स्पष्ट झाल्याने सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केलं.
सीआयएसएफला पेट्रोलने भरलेल्या काही बाटल्या फेकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्या बाजूला केल्या. या घटनेने विमानतळावरील कामकाज किंवा उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही. सीआयएसएफने याबाबत स्थानिक पोलिसांना पाचारण केलं. त्यांनी संरक्षक भिंत परिसर आणि झोपडपट्टी परिसर पिंजून काढूनही संशयितांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. दिल्लीनंतर मुंबई देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे.
Previous Articleऑनलाईन क्लाससंबंधीही सावधगिरी बाळगा
Next Article सदाशिवनगर येथे पाऊण लाखाची घरफोडी








