प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांना अवैध धंद्यांनी विळखा घातला आहे.कित्येक कुटूंबे ऊद्वस्त झाली आहेत.तालुक्यातील हे काळे धंदे तात्काळ बंद करा अन्यथा १ सप्टेंबर रोजी तिव्र आंदोलन करणार असा इशारा गगनबावडा तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार संगमेश कोडे, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांना दिले आहे.
गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा,असळज,निवडे,साळवण,तिसंगी,धुंदवडे,शेळोशी अशा प्रमुख गावांत दारु,मटका,जूगार या अवैध धंद्यांनी ठाण मांडले आहे.तालुक्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या ठिकाणी राजरोसपणे हे धंदे सुरू आहेत.एझीमनीच्या नावाखाली युवा वर्ग काळ्या धंद्यांना बळी पडला आहे.गेल्या दोन वर्षात २० ते ४० या वयोगटातील तालुक्यातील ४७ जण दारुच्या वेसनाने मरण पावले आहेत.कर्जबाजारी होऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
तालुक्यास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संबंधितावर गगनबावडा पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी.या गून्हेगारी प्रव्रुत्तीस आळा घालावा सर्वच ठिकाणचे अवैध धंदे बंद करावेत अन्यथा एक सप्टेंबर पासून तिव्र आंदोलन करणार असा इशारा गगनबावडा तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन तहसिलदार संगमेश कोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांना देण्यात आले.