चेअरमन विश्वास पाटील, सांगोला येथे बल्क मिल्क कुलरचा शुभारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोकुळ दूध नजीकच्या काळात महाराष्ट्राच्या उर्वरित भागाबरोबरच इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा गोकुळचा मानस आहे. असे प्रतिपादन चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. सांगोला तालुक्यातील अकोला येथील आदर्श महिला दूध संस्थेत येथे गोकुळच्या बल्क मिल्क कुलरच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे होते.
विश्वास पाटील म्हणाले, गोकुळने दूध संकलनाचे कार्यक्षेत्र हे कोल्हापूर जिह्यापूरतेच मर्यादित न ठेवता शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिह्यात देखील दूध संकलन करण्यास सुरूवात केलेली आहे. उत्तम गुणवत्तेमुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मुंबई, पुणे, कोल्हापूर सांगली, सातारा, बेळगाव तसेच कोकण विभागामध्ये दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. सध्या 13 ते 14 लाख लिटर्स दूध संकलन करणारा गोकुळ 20 लाख लिटर्स उद्दिष्ट निश्चितच साध्य करेल आणि दूध विक्रीचे क्षेत्र वाढल्याने दूध विक्रीमध्ये वाढ तसेच मूल्यवृध्दी होऊन दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देता येईल असे पाटील यांनी सांगीतले.
अध्यक्षपधवरुन बोलताना लिगाडे म्हणाले, गोकुळचे नाव संपूर्ण देशात नावारूपास येईल यात शंका नाही. तसेच 15 हजार लिटर्स क्षमतेच्या या बल्क कुलरमुळे अकोला परिसरातील संपूर्ण दूधाचे याठिकाणी संकलन होण्यास मदत होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्याती दूध उत्पादकांना यांचा फायदा होणार आहे. गोकुळ दूध संघामुळे कोल्हापूर प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पाकांची प्रगती होणार आहे. भविष्यात या सारखे बल्क कुलर्स तालुक्यात वेगवेगळÎा भागात सुरू करून उत्तम गुणवत्तेचे दूध संकलन करण्यसाठी गोकुळ दूध संघास सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
यावेळी संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, राणी चौगुले, संभाजी चौगुले, विठ्ठल शिंदे, अशोक शिंदे, जगन्नाथ शिंदे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आदी.