साटेली भेडशी /प्रतिनिधी-
साटेली भेडशी गावात मागील काही दिवस विद्युत सेवा वारंवार खंडित होत आहे.रात्री अपरात्री विद्युत प्रवाह खंडित करणे.खंडित विद्युत प्रवाह तासनतास सुरळीत न करणे तर रोज त्या ठराविक वेळेलाच विद्युत खंडित करणे यामुळे ग्रामस्थ ,व्यापारी बांधव त्रस्त झाले असून वीज वितरणाच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहे.काही महिन्यांवर गणेश चतुर्थी सण आल्याने या प्राश्वभूमीवर नागरिकांची विविध घरगुती कामे सुरू आहेत तर व्यापारी बांधवांना सुध्दा नियमित अखंडित विद्युत सेवा मिळणे गरजेचे आहे मात्र साटेली भेडशीतच मागील काही दिवस विद्युत सेवा वारंवार खंडित होत असल्याने मोठी गैरसोय होते.रात्री अपरात्री विद्युत प्रवाह खंडित करणे.खंडित विद्युत प्रवाह तासनतास सुरळीत न करणे यामुळे ग्रामस्थ ,व्यापारी बांधव त्रस्त झाले आहे या त्रासाबद्दल ग्रामस्थ , व्यापारी बांधव यांना सोबत घेऊन दोडामार्ग विभागीय कार्यालय अभियंता ,साटेली भेडशी शाखा कार्यालय उपअभियंता यांना जाब विचारण्यासाठी बुधवारी घेराव घालण्यात येईल असा इशारा उपसरपंच गणपत डांगी यांनी दिला आहे.
वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्यास येथील वीज कर्मचारी जबाबदार आहे.पावसापूर्वी जी कामे करावयाची होती त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.तर विजेबाबत तक्रारी नोंदवायच्या झाल्यास ,संपर्क साधायचा झाल्यास साटेली भेडशी शाखा कार्यालयात कोणीही उपस्थित नसतो.त्यामुळे दोडामार्ग तालुका वीज वितरण कार्यालय अभियंता यांनी येत्या दोन दिवसांत विजेच्या अडचणीबाबत ग्रामपंचायत व्यापारी ,ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करावी व योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी डांगी यांनी केली आहे.









