वृत्तसंस्था/ सायतामा
अमेरिकेच्या महिला बास्केटबॉल संघाने रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारातील अमेरिकन महिला संघाचे हे सलग सातवे विजेतेपद आहे.
सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत अमेरिकेने यजमान जपानचा 90-75 असा पराभव केला. अमेरिकन संघातील ब्रिटेनी ग्रिनेरने 30 गुण नोंदविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत अमेरिकेने जपानवर 50-39 अशी आघाडी मिळविली होती. 1992 सालामध्ये अमेरिकन संघाला या क्रीडाप्रकारात शेवटचा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अमेरिकन महिला संघाने आपली विजयी घोडदौड 55 सामन्यामध्ये राखत अखेर टोकियो ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळविले. अमेरिकेचे या क्रीडाप्रकारातील हे सलग सातवे जेतेपद आहे.









