कर्नाटक राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारं पाहिलं राज्य ठरणार
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आदेश पारित केला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणावर लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
दरम्यान, उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी शनिवारी शिक्षण विभाग आणि राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. उच्च शिक्षण मंत्र्यांनी या बठकीत घोषणा केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री म्हणाले. त्यानुसार, विद्यार्थ्यांना इतर गोष्टींबरोबरच तीन वर्षांची बॅचलर किंवा चार वर्षांची ऑनर्स पदवी मिळवण्याची संधी असेल.
उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे सादर करणारे कर्नाटक पहिले राज्य आहे. हे प्रत्येक नागरिकाला चांगले भविष्य घडवण्यास आणि सक्षम बनवण्यास मदत करेल. शिक्षण आणि कौशल्य विकास आम्हाला सर्व आव्हानांचा सामना करण्यास मदत करू शकते, असे ते म्हणाले.