हसन/प्रतिनिधी
हसन येथील १०० पेक्षा जास्त नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. बहुतांश विद्यार्थी हे शेजारील केरळ राज्यातील असून गेल्या तीन दिवसांत विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. तसेच यापैक्की दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडत असल्याने आरोग्य अधिकारी आणि सरकारसाठी चिंतेचे कारण आहे कारण हसन शहर गुरुवारपासून तीन नर्सिंग कॉलेजमधील प्रकरणांसह कोविड क्लस्टर बनले आहे. काही वगळता सर्व संक्रमित विद्यार्थी मुली आहेत. गुरुवारी, निसर्ग नर्सिंग कॉलेजमधील २१ विद्यार्थ्यांनी सकारात्मक चाचणी केली आणि इतर २४ त्यांच्या संपर्कात आल्या आहेत. या२४ पैकी चार शनिवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तर सर्व २५ विद्यार्थी एकाच महाविद्यालयातील आहेत आणि पीजी निवासात राहतात.
दरम्यान अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व १० नर्सिंग कॉलेजच्या सुमारे१ हजार ८०० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आणि १०० पेक्षा जास्त विद्यार्थी संक्रमित आढळले. यातील ९० टक्के रुग्ण केरळचे आहेत आणि ते २७ जुलैपूर्वी हसनमध्ये आले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारी, राजीव नर्सिंग कॉलेजचे ३७ विद्यार्थी आणि हसन शहरातील रथना नर्सिंग कॉलेजचे २४ विद्यार्थी संक्रमित झाले आणि त्यांना उपचारासाठी अलग ठेवले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात विद्यार्थी भोजनालय आणि हॉटेलमध्ये गेले असल्याने अधिकारी चिंतेत आहेत.
“सर्व वसतिगृहातील आणि पेइंग गेस्ट हाऊसमधील विद्यार्थ्यांची चाचणी केली जाईल. सुरुवातीला, अधिक विद्यार्थी असलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची सोमवारपासून चाचणी केली जाईल,” असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. केएम सतीश यांनी सांगितले. शनिवारी, हसनने 129 ताज्या प्रकरणांची नोंद केली, ज्यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.