ऑनलाईन टीम / पुणे :
जागतिक वुशू कुंग फू दिनानिमित्त पुण्यातील वुशूच्या स्पर्धकांनी वुशूची प्रात्यक्षिके सादर केली. यामधून निरोगी आरोग्य आणि स्वसंरक्षण कसे साध्य करता येईल हे सांगण्यात आले. पुण्यासह देशभरात विविध उपक्रम राबवून जागतिक वुशू कुंग फू दिवस साजरा करण्यात आला.
ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.झेंडे आणि महासचिव सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात वुशू दिन साजरा करण्यात आला. यासोबतच महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण करण्यात आले.
सोपान कटके म्हणाले, आरोग्य आणि भविष्य या संकल्पनेवर आधारित जागतिक वुशू कुंग फू दिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यात खेळाडूंनी वुशूची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह बाजवा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वुशू कुंग फू दिन साजरा करण्यात आला. हेल्थ ऍण्ड फ्युचर या संकल्पनेवर आधारित दिन साजरा करण्याचे आवाहन त्यांनी सर्व राज्यांना केले होते.