मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
मोरजी /प्रतिनिधी
विध्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱया शैक्षणिक संस्थाशी आपल्या सरकारने कधीही राजकारण केलेले नाही.मांदे महाविध्यालायचे थकीत अनुदान एकरकमी देण्यात येईल तसेच या महाविध्यालयाला यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य दिले जाईल कुठल्याही शिक्षण संस्थेवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेवू., असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
माजी केंद्रीय मंत्री तथा मांदे महाविध्यालायाचे चेअरमन एड.रमाकांत खलप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून दीनदयाळ सभाग्रहात विकास परिषद ,मांदे तर्फे आयोजित केलेल्या संस्थेच्या स्थापना सप्ताहाच्या तसेच मांदे महाविध्यालयाच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत,मांदेचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे,गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.वरूण साहनी,उच्च शिक्षण संचालक .प्रसाद लोलयेकर ,जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर ,मांदेचे सरपंच सुभाष आसोलकर ,सत्कार मूर्ती एड सुरेंद्र देसाई ,एड पराग राव,विकास परिषद मांदेचे चेअरमन रमाकांत खलप,सौ निर्मला खलप,निखील खलप ,प्राचार्य तुषार अणवेकर , प्रा.सुभाष वेलिंगकर ,मांदे परिषदेचे पदाधिकारी नारायण नाईक,नामदेव सावंत ,एड अमित सावंत ,मनोहर म्हामल ,मिंगेल डिसौझा ,जयवंत हनजुनकर,रमेश शेटमांदेकर ,महेश मांदेकर ,कृष्णा गावकर ,उमेश गावकर ,चंद्रकांत साळगावकर ,दाजी आजगावकर मुख्या ध्यापक श्री चोडणकर आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले आजच्या संस्थांनी केवळ पदव्या देणारे शिक्षण न देता वेगळय़ा वाटा शोधायला हव्यात मळलेल्या वाटावर न जाता नवनवीन असे रोजगाराभिमुख कोर्सेस सुरु करायला हवेत त्यासाठी सरकार कडून आवश्यक सहकार्य दिले जाईल.प्रधान मंत्री कौशल्य योजना मार्गी लावाव्यात जेणे करून गोव्यातील तरुणांना गोव्यातच रोजगार उपलब्ध होईल .त्यांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही वा हिमाचल ,जम्मू आदि राज्यातील मनुष्य बळ गोव्यात आणावे लागणार नाही.असे सांगून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमल बजावणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी सहकार्य करायला हवे असे सांगितले
एड .रमाकांत खलप यांच्या समाजाभिमुख कार्याचा त्यांनी गौरव केला देश विदेशात आपल्या कर्तबगारी साठी प्रसिद्ध असलेल्या अश्या राजकारण्यांची राज्याला तसेच देशाला गरज आहे असे सांगून काँग्रेस पक्षांने त्यांना उमेदवारी ध्यावी असे सांगितले
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले,राज्यात आणि देशाच्या राजकारणात नाव कमावलेले एड खलप हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांनी राजकारणा बरोबर सामाजिक ,शैक्षणिक ,सहकार आणि साहित्य क्षेत्रात उज्वल कामगिरी केली आहे विद्यादानंसारख्या क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करनाऱया त्यांच्या शैक्षणिक संस्थेस सरकारने सहकार्य करावे मांदे च्या गरीब जनतेसाठी गावातच दर्जेदार असे शिक्षण त्यांनी ध्यावे त्यांनी यापुढेही गोव्याचा तसेच देशाच्या राजकारणात कार्यरत राहावे आपल्या अनुभवी व्यक्तिमत्वाचा इतरांना फायदा करून द्यावा असे सांगीतले.
यावेळी बोलताना आमदार दयानंद सोपटे म्हणाले राजकारणामद्धे स्वार्थी जरूर असावे मात्र शैक्षणिक संस्थात राजकारण मुळीच आणू नये विध्यार्थ्यांच्या भवितव्याशी कदापि खेळू नये मान्देतील गरीब मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे या मताचा मी आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेला सरकार कडून योग्य ती मदत मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन मांदे महाविध्याल्याला आवश्यक सहकार्य करीन असे सांगितले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एड खलप यांनी मांदे महाविध्यालयाला सहकार्य करणाऱया सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांच्या पगारासाठी अनुदान सुरु करणाऱया सरकारने महाविध्यालायासाठी इतर अनुदानही सुरु करावे असे सांगून संस्थेतर्फे भविष्यात रोजगाराभिमुख शिक्षण सुरु करण्याचा मनोदय व्यक्त करून विध्यमान सरकारचे आभार मानले
याप्रसंगी उपकुलगुरू वरूण साहनी.प्राचार्य अणवेकर यांची भाषणे झाली .या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविध्यालायाला सहकार्य करणाऱया उपकुलगुरू डॉ. वरूण साहनी ,रजिस्ट्रार राधिका नायक ,माजी प्राचार्य गोपाल कृष्ण कोंडली ,प्रोफेसर शंकर नारायण , एड .सुरेंद्र देसाई ,एड पराग राव,आर्किटेक नंदन सावंत ,यांचा मुख्यंमंत्री ,विरोधी पक्षनेते ,तसेच आमदारांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला . तेजल नाईक हिने मानपत्राचे वाचन केले.
तसेच मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत,माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ,आमदार दयानंद सोपटे ,जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर ,मांदेचे सरपंच सुभाष आसोलकर यांचा एड खलप यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान केला
प् केक कापून खलप यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला तसेच मुख्यमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते मानपत्र तसेच मोठा पुष्पहार अर्पण करून एड खलप यांचा सत्कार करण्यात आला दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्थापना सप्ताहाला प्रारंभ झाले 12 ऑगस्ट पर्यंत हासाप्ताह चालेल
तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री श्री कामत यांनी नामफलकाचे अनावरण करून मांदे महाविध्यालायाचे औपचारिक उद्घाटन केले
सुरवातीला डॉ.प्रतीक्षा खलप यांनी सर्वांचे स्वागत केले नेत्रा पार्सेकर ,अनघा आजगावकर ,वरदा तळकर ,गौरी नाईक यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली प्रा. .समीक्षा गावकर वप्रा बबिता भिवशेट यांनी सूत्रसंचालन केले प्रा . अरुण नाईक यांनी मान्यवरांचा परिचय केला. प्रा.सीताराम आश्वेकर यांनी माजी विध्यार्थ्यांच्या वतीने खलपांना फोटो प्रेम प्रदान केली
नारायण नाईक यांनी सत्कारमूर्ती भाई खलप यांचा परिचय केला व शेवटी आभार मानले
यावेळी अनेकांनी एड खलप यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.