मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसींना वैद्यकीय प्रवेशात कशाच्या आधारे 27 टक्के आरक्षण दिलं?, असा सवाल नाना पटोले यांनी केंद्र सरकारला केला आहे. नाना पटोले आज रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हा सवाल केला.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिलं आहे. ते कशाच्या आधारावर दिलं आहे? एकीकडे ओबीसींचं राजकीय आरक्षण काढलं. त्याचे आकडे द्यायला केंद्र सरकार तयार नाही. केद्रांच दुटप्पी धोरण सुरू आहे. आणि राज्याकडे बोट दाखवले जाते. आरक्षण संपविण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. मागासवर्गीय आयोगाने जातीनिहाय जनगणना करण्याच मान्य केलं आहे आणि महाराष्ट्रात ही जनगणना होणार आहे, असं पटोले यांनी सांगितलं.
एक दिवस सासूचा एक दिवस सुनेचा असतो असा आमचा देवेंद्र फडणवीस यांना निरोप द्या. राजभवनामध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था सुरु झाली आहे. ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यपालांना काही संवैधानिक मर्यादा आहेत. त्यांनी त्या प्रमाणेच वागलं पाहिजे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे संविधानाला मानणार राज्य आहे, असंही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








