प्रतिनिधी /बेळगाव
जितो लेडिज विंग बेळगावतर्फे नुकताच ‘सेंद्रीय भाजीपाला पिकवा व खा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषीतज्ञ अभय देसाई यांनी ‘किचन गार्डन’ ही संकल्पना महिलांना समजावून दिली.
जगातील 99 टक्के अन्न हे केमिकलयुक्त असते. त्यामुळे लहानशा जागेत किंवा कुंडय़ांमधून भाजीपाला, फळे यांचे घरापुरते तरी उत्पादन करा, असे ते म्हणाले. याशिवाय सेंद्रीय खत कसे तयार करावे याची माहिती देऊन. त्या त्या मोसमामध्ये मिळणाऱया भाज्या, फळे खावीत. डबाबंद पदार्थ खाऊ नयेत, पाश्चात्यांचे अंधानुकरण करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी जितो लेडिज विंगच्या अध्यक्षा अरुणा शहा यांनी स्वागत केले. भारती हरदी, तृप्ती मांगले यांनी कार्यक्रमाचा हेतू समजावून सांगितला. मिनल शहा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. लता परमार यांनी सूत्रसंचालन केले. सचिव शिल्पा हजारे यांनी आभार मानले.









