गोवंश रक्षा अभियानची मागणी
प्रतिनिधी /पणजी
मेघालय राज्याच्या पशुपालनमंत्री सनबूर शुल्लाई यांनी एका कार्यक्रमात बोलताना चिकन मटण खाण्यापेक्षा गोमांस खाण्याचे वक्तव्य केले त्याचा गोवंश रक्षा अभियानतर्फे आज निषेध केला. याबद्दल जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन दिले असून या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यावर कारवाई करावी. हा मंत्री गाईला मारण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे. यावर कारवाई करावी अशी मागणी गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्यपालांनाही मंत्र्यांची हकालपट्टी करावी यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे आणि हे निवेदन राष्ट्रपतींकडे पोहचावे यासाठी मागणी करणार असल्याची माहिती परब यांनी यावेळी दिली. हिंदू संस्कृतीचा नाश करण्यासाठी पुढे आले आहेत. संस्कृतीविरोधात भाजप रमली आहे. पूर्वीची भाजप राहिली नसून व्यावसायिक भाजप झाली आहे असा आरोप घटनेच्या विरोधात या मंत्र्यांने वक्तव्य केले आहे. गोवंश ही राष्ट्राची प्रतीक आहे. अशा वक्तव्याने राष्ट्राचे प्रतीक नामशेष करण्याच्या मार्गावर आहे. अशा भाजपच्या मंत्र्यांना लोकांनी निवडून आणू नये, यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन गोवंश रक्षणार्थ आंदोलन करणार आहे असे हनुमंत परब यांनी सांगितले.









