प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव बाजार गल्लीतील गणेश मंदिरात यात्रा काळातील प्रत्येक मंगळवारी एक या प्रमाणे आज पाचव्या गुळ्ळवा मूर्तीचे पूजन करून गणेशमूर्तीला पंचाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मारूती मूर्तीला सर्व भाविकांच्यावतीने पुजारी अजित कुलकर्णी यांनी तैलाभिषेक केला. आगामी काळात कोरोनाचे सावट दूर व्हावे म्हणून गाऱहाणे घालून पूजन करण्यात आले. सर्वाना तीर्थ प्रसाद देण्यात आला. यावेळी मंदिराचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते.









