इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याला मंगळवारी दुपारी शॉर्टसर्कीटने आग लागली. या आगीत सुमारे 1 कोटी 20 लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 4 अत्याधुनिक यंत्रमाग, 8 कापडाचे बिमे आणि 20 हजार मिटर कापड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
खंजिरे औद्यागिक वसाहतीमध्ये पदमचंद मिलाफचंद जैन यांचा गेल्या 25 वर्षांपासून अत्याधुनिक यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किटने आग लागली. ही आगीची घटन कारखान्यातील कामगारांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरीत आग विझवण्यासाठी नगरपालिका आणि पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानानी कारखान्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून 4 अग्निशमन दलाच्या जवानानी पाण्याचा मारा करीत, तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. या आगीत 4 अत्याधुनिक यंत्रमाग जळून खाक झाले असून 8 कापडाचे बिमे, 20 हजार मिटर कापड यासह अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे 1 कोटी 20 लाखाचं नुकसान झाले आहे. यांची नोंद पोलिसात झाली आहे.