सावंतवाडी/ प्रतिनिधी-
शिरशिंगे मळईवाडी येथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणेत आले.पुरामुळे शिरशिंगे मळईवाडी येथील नदीच्या पलीकडे असणारी वाडी मोठा साकव तुटल्याने त्यांचा पूर्ण संपर्क तुटलेला होता.ही बाब उपसरपंच श्री.पांडुरंग राऊळ, माजी सभापती रवींद्र मडगावकर,पंढरीनाथ राऊळ आणि विशेष म्हणजे तालुक्याचे उपसभापती श्री.शीतल राऊळ यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर श्री.प्रसाद देवधर यांच्या कानांवर घालताच त्यांनी तेथिल15 कुटुंबाना जीवनावश्यक लागणारे सर्व साहीत्य दिले.यावेळी माजी सरपंच श्री.नारायण राऊळ, गणपत राणे,अमित राऊळ, ग्रा.प. सदस्य श्री.संदिप राऊळ, गंगाराम राऊळ, श्री.अमोणेकर ,वसंत राऊळ, सुरेश राऊळ, वासुदेव राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ देवधर यांचे आभार मानण्यात आले.









