वार्ताहर / मालवण:
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 41 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना 1, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ) 1, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट ब) 13, संजय गांधी निराधार योजना 26 अशा एकूण 41 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.









