प्रतिनिधी / बेळगाव
चार्टर्ड अकौंटंट संस्थेच्या बेळगाव शाखेतर्फे जीएसटी या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चेंबर ऑफ कॉमर्स, लघु उद्योजक संघटना व ज्युवेलरी असोसिएशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते. सीएंच्या बेळगाव शाखेचे चेअरमन राहुल अडके यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी अर्थव्यवहारात जीएसटीचे महत्व विशद केले.
बेळगाव जीएसटी खात्याचे सहाय्यक आयुक्त राजेश राव यांनी अशी चर्चासत्रे आजच्या काळात आवश्यक असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. चेंबरचे प्रेसिडेंट पंचाक्षरी चोन्नद, ज्युवेलरी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव अणवेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी जीएसटीचे उपायुक्त मुकुंदकुमार, सहाय्यक आयुक्त अजिंक्मय काटकर, निरीक्षक शिवा पाटील, आर. डी. मेघण्णावर, उपायुक्त सी. एम. लोकरे यांनी चर्चेमध्ये भाग घेतला. सी. ए. तेजस मेहता व सीए पद्मश्री पाटील यांनी प्रश्नोत्तराचे सत्र सांभाळले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश मेहता, जयकुमार पाटील, नितीन निंबाळकर या सीएंंनी विशेष पुढाकार घेतला. सीए एम. एस. तिगडी यांनी आभार मानले.









