जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कवठेसार येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाला. मंगल दादासो फरांडे (वय६५) असे मृत महिलेचे नाव आहे. ट्रॅक्टर टँकरमधून विजेच्या मोटर पंपाच्या साहाय्याने पिण्याचे पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून जागेवरच मृत्यू झाला.
मागील आठवड्यात वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे गावातील नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने कुंभोजच्या नीलकमल वॉटर सप्लायर्स ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावात गेली दोन दिवस पाणी विक्री करत होती.दोन दिवस टँकरला शॉक बसत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते.नागरिकांनी टँकर चालकाला याची जाणीव करून दिली होती.पण टँकर चालकाने याकडे दुर्लक्ष करून तसेच गावात पाणी पुरवठा चालू ठेवल्यामुळे च आज ही दुर्घटना घडलीअसल्याची चर्चा यावेळी नागरिकांतून चालू होती. या घटनेने कवठेसार परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची वर्दी शांतीनाथ फरांडे यांनी दिली.सहाय्यक फौजदार एम बी कोळी, कॉन्स्टेबल मंगेश पाटील यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनसाठी जयसिंगपूर आरोग्य केंद्रात पाठविला. मृत फरांडे यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









