प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 15 जणांचा मृत्Îू झाला. दिवसभरात 467 नवे रूग्ण आढळले तर 923 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 9 हजार 762 झाली आहे. सोमवारच्या तुलनेत कोरोना मृत्यू , नव्या रूग्णांत वाढ झाली आहे. तीन महिन्यांनंतर प्रथमच सक्रीय रूग्णसंख्या 10 हजारांच्या खाली आली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 15 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 367 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 902, नगरपालिका क्षेत्रात 752, शहरात 1 हजार 146 तर अन्य 567 आहेत. दिवसभरात 923 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 79 हजार 170 झाली आहे. गेल्या 24 तासांत 467 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 16, भुदरगड 5, चंदगड 2, गडहिंग्लज 5, गगनबावडा 1, हातकणंगले 51, कागल 37, करवीर 72, पन्हाळा 6, राधानगरी 17, शाहूवाडी 1, शिरोळ 29, नगरपालिका क्षेत्रात 30, कोल्हापुरात 186 तर अन्य 9 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 94 हजार 299 झाली आहे.
सिंधुदुर्गातील एकाचा तर कोल्हापुरातील चौघांचा मृत्यू
परजिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाचा त कोल्हापूर शहरातील चौघांचा मृत्यू झाला. शहरात 186 नवे रूग्ण दिसून आले कोरोनाने मृत्यू झालेल्यांत कसबा बावडा, जवाहरनगर, मंगळवार पेठ व शहरातील अन्य एकाचा समावेश आहे.
जिल्ह्यात `म्युकर’चा 1 बळी, 1 नवा रूग्ण
जिल्ह्यात मंगळवारी म्युकर मायकोसीसने सीपीआरमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 1 नवा रूग्ण दिसून आला. जिल्ह्यात आजपर्यत म्युकर मायकोसीसचे 305 रूग्ण दिसून आले. त्यापैकी 64 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 90 रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यत 151 जणांना डिसचार्ज मिळाला आहे, अशी माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.
| आजचे | एकूण | |
| कोरोना रूग्ण | 467 | 1,94,299 |
| कोरोनामुक्त | 923 | 1,79,170 |
| कोरोना मृत्यू | 15 | 5367 |
| सक्रीय रूग्ण | 9772 |
| वर्गवारी | कोल्हापूर शहर | ग्रामीण, अन्य | एकूण |
| आजचे बाधित रूग्ण | 186 | 281 | 467 |
| आजपर्यतचे बाधित | 51529 | 1,42,770 | 1,94,299 |
| आजचे कोरोनामुक्त | 923 (शहर, ग्रामीण) | 1,79,170 | |
| दिवसभरातील मृत्यू | 4 | 11 | 15 |
| आजपर्यंतचे एकूण मृत्यू | 1138 | 4221 | 5367 |
| दिवसभरातील चाचण्या | पॉझिटिव्ह | निगेटीव्ह | एकूण |
| आरटीपीसीआर | 138 | 2105 | 2243 |
| अँटीजेन | 215 | 2096 | 2311 |
| ट्रुनेट | 114 | 266 | 380 |
| सक्रीय रूग्ण | 9762 |
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर : 91.95 टक्के
आजअखेर एकूण चाचण्या
मंगळवार : 4934
एकूण 14,78,748
मृतांची संख्या ः 15
जिल्हा ः 14
बाहेरील ः 1
दीर्घकालीन व्याधी 4 0
60 वर्षावरील 9 1
पहिल्या 48 तासात मृत्यू 2 0
आजअखेर मृत 5367
जिल्हा : 4800
अन्य : 567









