सातारा / प्रतिनिधी
वाई वनविभागाला मिळालेल्या खास खबऱ्याच्या माहितीवरून वाई तालुक्यातील बावधन गावच्या हद्दीत रास्ते मळा परिसरात रान डुक्कराची शिकार करणारे 12 जण वन विभागाच्या जाळ्यात सापडले. सर्वजण नायगाव ता. खंडाळा येथील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वाई वन परिक्षेत्राचे अधिकारी महेश झांझुरणे यांनी दिली.
वाई तालुक्यातील बावधन येथे रास्ते मळा शेजारील महादेव मंदिर परिसरात धोमच्या उजव्या कालव्याच्या परिसरात काहीजण शिकार करत असल्याचे समजताच वन विभागाचे पथक पोहचले तेथे गस्त घालत असताना पिकअप क्रमांक एम एच 45 ए एफ 2932 ही संशयास्पद आढळून आली. त्याची चौकशी केली असता रामचंद्र लष्मण वाघमोडे(वय 50), सुरेश रामा जाधव(वय 18), तात्या रामा जाधव(वय 22), तानाजी शंकर पवार(वय 48), तात्या सुरेश पवार(वय 20), शिवाजी रामा पवार( वय 25), तानाजी शिवाजी वाघमोडे(वय 23), मोतीराम रामचंद्र शिंदे(वय 26), तात्याबा रामा पवार(वय 33), रामचंद्र शिवाजी वाघमोडे (वय 25), रामचंद्र व्यंकू पवार( वय 28), रामदास मधुकर जाधव(वय 27, सर्व रा. नायगाव, ता. खंडाळा) यांनी पूर्व नियोजन करून रान डुक्कर शिकार करण्यासाठी वाघर लावून कळकाच्या काठयाने जिवंत रान डुक्कर पकडून वाहनातून नेत असल्याचे आढळून आले.
त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यामध्ये त्यांच्याकडून जिवंत रान डुक्कर,6 वाघरा, 20 कळकाच्या काठ्या व पिकअप असा सुमारे 3 लाख 51 हजार 400 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून पकडलेले जिवंत रान डुक्कर पशुसंवर्धन अधिकारी श्रीमती सभा नालबंद यांच्याकडून तपासणी करून वनांमध्ये सोडण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी सचिन डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईच्या वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांझुरणे, वनपाल सुरेश फटकारे,रत्नकांत शिंदे, वनरक्षक वैभव शिंदे, सुरेश सूर्यवंशी, वसंत गवारी, अजित पाटील, प्रदीप जोशी, संदीप पवार, अश्विनी कारंडे, वनसेवक संजय चव्हाण, सुरेश सपकाळ, महेंद्र मोरे यांनी केली आहे.









