बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सुमारे दीड वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू होण्याचा मार्गावर होत्या. राज्यसरकारने लवकरात लवकर शाळा करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
तथापि, सार्वजनिक शिक्षण संचालक (डीपीआय) यांनी सोमवारी आपला अहवाल सरकारकडे सोपविला. १ ऑगस्ट रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली आहे. संचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च वर्ग (इयत्ता ६ वी आणि त्यावरील) सुरु करण्यात येणार आहेत. असे या अहवालात अहवालात नमूद केले आहे. ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार होता.
गेल्या आठवड्याच्या सुरूवातीस प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेण्याची घोषणा केली होती. तथापि, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांना राजीनामा दिल्याने मंत्रिपरिषद विसर्जित झाल्यामुळे या प्रक्रियेला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.