2,378 अहवाल निगेटिव्ह : सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट : 67 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 24 तासात 2 हजार 378 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर सोमवारी जिल्हय़ातील 69 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बेळगाव तालुक्मयातील 70 वषीय वृद्ध व गोकाक तालुक्मयातील 27 वषीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुक्त झालेल्या 67 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांमधून घरी जावू देण्यात आले. सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून अद्याप 662 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 860 वर पोहोचला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 77 हजार 986 वर पोहोचली आहे. त्यापैकी 76 हजार 464 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 1 हजार 267 जणांचे अहवाल यायचे आहे.
आतापर्यंत 10 लाख 56 हजार 546 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 72 हजार 943 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
धामणे, उचगाव, टिळकवाडी, कडोलकर गल्ली, भाग्यनगर, मंडोळी रोड, शहापूर, विजयनगर, महांतेशनगर, हनुमाननगर, गांधीनगर, राणी चन्नम्मानगर, काकती, हिंडलगा, क्लबरोड, परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी टिळकवाडी परिसरात रुग्णसंख्या अधिक होती.









