अस्मानी संकटामुळे शिवाजी विद्यापीठाचा निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
अस्मानी संकटामुळे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मार्च-एप्रिल 2021 उन्हाळी परीक्षांचे अर्ज विद्यार्थ्यांना वेळेत भरता आलेले नाहीत. त्यामुळे हे परीक्षा अर्ज भरण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 30 जुलैपर्यंत परीक्षा अर्ज भरून महाविद्यालय किंवा अधिविभागांकडे जमा करावयाचा आहे.
महाविद्यालय किंवा अधिविभागांनी परीक्षा अर्जांच्या याद्या विद्यापीठ प्रशासनाकडे 3 ऑगस्टपर्यंत नियमित शुल्कासह जमा करावयाच्या आहेत, तरी विद्यार्थ्यांनी वेळेत आपला परीक्षा अर्ज भरावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले आहे.