बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात भाजप नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरु असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटक भाजपमध्ये कोणतेही संकट नसल्याचा दावा केला. तसेच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दक्षिणेकडील राज्यात आणि पक्षाक्सचे काम चान्गल्याप्रकारे केल्याचे म्हंटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बेळगाव जिल्ह्याच्या पुरस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर असताना पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते आणि संध्याकाळ पर्यंत पक्षश्रेष्ठी नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा करतील असे म्हंटले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाध्यक्ष नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केल्याने मुख्यमंत्री पदी येडियुरप्पा कायम राहतील असं बोललं जात आहे.
दरम्यान, नड्डा यांनी “येडियुरप्पांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात चांगले काम सुरु आहे. येडियुरप्पा सर्व परिस्थिती योग्यरीत्या हाताळत आहेत,” असे त्यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कर्नाटकचा प्रश्न आहे की, कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री बदलाविषयी भाष्य करू शकतील का, असे विचारले असता नड्डा म्हणाले: “तुम्हाला असे वाटते (ते संकट आहे). मला असे वाटते कि कोणतेही संकट नाही. ”
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीवर नजर ठेवण्यासाठी गोव्यात असलेले नड्डा यांनी आगामी निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे त्यांनी कौतुक केले.