पन्हाळा तालुका पूरस्थिती आढावा बैठकीत खा. धैर्यशील माने यांचे निर्देश
वारणानगर / प्रतिनिधी
महापूरात बाधीत झालेल्या सर्वांनाच शासनाची मदत पोहचवण्याचे नियोजन करा असे निर्देश खा. धैर्यशील माने यांनी पन्हाळा तालुका पूर परस्थिती आढावा बैठकीत दिले. महापूरात शासनाने सोय केलेल्या व आप्तनातलगाकडे स्थलातरीत झालेल्या सर्वांची नोंद ठेवावी, पूरात घरे बाधीत झाली आहेत. अशा घरांना किंवा कायमस्वरूपी स्थलातंरीत करावे लागणाऱ्या कुटूंबाचे सर्वेक्षण करून यादी तयार करा. पक्की घरे नवीन निर्माण करणे भूस्सखलन भागात रहाणाऱ्या कुटूंबांना सुरक्षित स्थळी कायम रहिवास करणे, खचलेल्या रस्ताची दुरुस्ती करण्याचे नियोजन, पुरात खाचून गेलेला शेतीचे व पिकांचे झालेले नुकसान, जनावरांचे नुकसान आदीबाबत पारदर्शी पंचनामे करावेत एकही बाधीत वंचीत राहू नये यासाठी पूरग्रस्त गांवात जनसुनावणी घेवून यादी करा, पुरात सापडलेल्या जनावरांचे लसीकरण करा असे निर्देश खा.माने यानी यावेळी दिले.
कोडोली ता. पन्हाळा येथील सिध्देश्वर हॉल येथे खा. धैर्यशील माने यानी पूरग्रस्त बाधीत कुटूंबातील नागरीक, शेतकरी यांच्याशी संवाद साधत पन्हाळा तालुक्यात पूर परस्थिती संदर्भात आढावा घेतला. यावेळी माजी आ. सत्यजीत पाटील, पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेडगे, पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तूळशीदास शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल कवठेकर, मंडल अधिकारी अभिजीत पवार, तलाठी अनिल पोवार, कोडोलीचे माजी उपसरपंच मानसिंग पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पन्हाळ गडाला कायम व पर्यायी रस्ता तयार करणे तालुक्यात भूस्सखलन होणाऱ्या भागातील कुटूंबाचे कायम स्वरुपी सुरक्षित स्थळी स्थलातर करणे. पूर क्षेत्रातील कुटूंबाचे स्थलातंर करणे. योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे. पुनर्वसनसाठी गावातील पर्यायी जागा गायरान निवड करणे अशी अनेक कामे मार्गी लावण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले नंतर उपलब्ध माहितीचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री ना. उद्वव ठाकरे यांना सादर करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन खा.माने यांनी यावेळी दिले.