नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
सिंधूने सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी केस्नीया पोलिकार्पोवा हिच्यावर दबाव ठेवून होती. तिने सुरुवातीला काही पॉईंट्स नावे केले, ज्यानंतर केस्नीयाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच न देता सामना जिंकला. सिंधू अगदी तुफान फॉर्ममध्ये दिसून येत होती. विशेष म्हणजे हा सामनार अर्धा तासही चालला नाही. सिंधूने अवघ्या 28 मिनिटांत सामना जिंकला.
पी व्ही सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग १२ पॉइंट्स मिळवत १७-५ अशी आघाडी घेतली होती. पहिला गेम २१-७ ने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम ठेवत २१-१० ने विजयाची नोंद केली आणि २९ मिनिटांत सामना पूर्ण केला. आता बुधवारी पी व्ही सिंधू हाँगकाँगच्या खेळाडूचा सामना करणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









