प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरात महापुराचे पाणी वाढल्याने राजवाडा येथे असणाऱ्या जिल्हा कारागृहात साडेतीन फुटापेक्षा अधिक पाणी शिरले आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या काही कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
यामध्ये 80 पुरुष कैदी आणि 24 महिला कैदी यांचा समावेश आहे. दरम्यान कारागृहात अद्यापी 300 कैदी असून ते सुरक्षित असल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. कारागृहात 2019 साली पुराचे पाणी आले होते. त्यावेळी येथील सर्व कैदी हलवण्यात आले होते, परंतु सध्याची पाणी पातळी कमी असल्याने सध्या फक्त काही कैद्याचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.