केळघर / वार्ताहर :
केळघर घाटातील रेंगडीवाडी ता. जावली येथील ओढ्याला आलेल्या महापुरात गुरुवारी सायंकाळी 4 जण वाहुन गेले होते. त्यामधील 2 महिलांचे मृतदेह आज हाती आले असून, दोन पुरुष अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.
गुरुवारी सायंकाळी ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या रेंगडीवाडीतील चौघांचा रात्री 11 वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, मुसळधार पाऊस व अंधारामुळे पुढील शोधकार्यात आडथळा निर्माण झाला. आज पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान सकाळी घटना घडलेच्या शंभर मीटर अंतरावर भागुबाई सहदेव कासुर्डे (वय 50) यांचा मृतदेह सापडला तर वरोशी येथील वरच्या ओढ्याच्या बाजुस तानुबाई किसन कासुर्डे (50) यांचा मृतदेह हाती लागला. अद्याप दोन पुरुष बेपत्ता असून शोधमोहिम सुरु आहे .
आज सकाळी जावलीचे प्रांतअधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार राजेंद्र पोळ, पोलीस उपनिरिक्षक अमोल माने, गटविकास अधिकारी सतिष बुद्धे, तलाठी मकरध्वज डोईफोटे, संदिप ढाकणे यांनी चालत जाऊन घटनास्थळी भेट देऊन घाटात शोध मोहिमेत सहभागी आहेत.









