प्रतिनिधी /बेंगळूर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मंगळूरमधील येनपोय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी ऑस्कर फर्नांडिस यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून विचारपुस केली.
योगासन करत असताना खाली पडल्याने ऑस्कर फर्नांडिस यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे आढळून आल्यानंतर मंगळवारी त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी माजी मंत्री एम. बी. पाटील, जनार्दन पुजारी यांनी येनपोय इस्पितळाला भेट देऊन फर्नांडिस यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांशी चर्चा केली.









