वार्ताहर / मौजेदापोली :
दापोली तालुक्यातील मुरुड कडून सालदुरेकडे जाणार खाडी पूल नादुरुस्त व धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पूलाचे नवीन बांधकाम होईपर्यंत ग्रामस्थांचे अतोनात हाल होणार आहेत.
मुरुड गावाकडून हर्णेकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर पडत होता. मात्र या खाडी पुलाला गेली अनेक वर्षे भगदाड पडत होते. मात्र यावर्षी हा पूल अधिकच नादुरुस्त झाल्याने वाहतुकी करिता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हर्णे कडे जाण्यासाठी आसूद पुलाला कडून प्रवास करावा लागत आहे. दिवाळीपासून या पुलाच्या नवीन बांधणीचे काम हाती घेतले जाणार आल्याचे चौकशी दरम्यान समोर आले.