ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात ‘बर्ड फ्लू’मुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियातील 11 वर्षीय मुलाला 2 जुलै रोजी एम्सच्या डी-5 वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला ताप आणि खोकला अशी लक्षणे होती. ही लक्षणे कोविडशी मिळती जुळती असल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यावेळी त्याच्या अन्य चाचण्याही करण्यात आल्या. त्याचे रिपोर्ट येण्यापूर्वीच सोमवारी या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी त्याचे रिपोर्ट आले तेव्हा त्याला H5N1 म्हणजेच बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. हे रिपोर्ट पाहून एम्स रुग्णालय प्रशासन देखील चक्रावले. कारण बर्ड फ्लूमुळे मृत्यू होणारी ही देशातील पहिलीच घटना होती.