सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत यांची पोलिसांकडे हाक
सावंतवाडी/ प्रतिनिधी-
देवसू भागात व परिसरात गेल्या काही वर्षापासून अधिक काळ बेकायदेशीर अवैध दारू व्यवसाय जोमात सुरू आहे. या व्यवसायामुळे या भागातील अनेकांचे कुटुंबे उध्स्त झाली आहेत. या अवैध दारू धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी गेल्या काही वर्षापासून देवसू भागातील महिला व ग्रामस्थांनी करूनही पोलिसांचे या व्यवसायाला अभय का असा सवाल आता ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. कोरोना महामारी काळातही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवैध धंदे या भागात वाढीस लागले आहेत. या अवैध दारू धंदा पायी चोऱ्या मारामाऱ्या, भांडणे, आत्महत्या, अनेकांचे दारूपायी मृत्यू असे प्रकार घडले आहेत. असे असताना पोलीस याकडे कानाडोळा का करत आहेत असा सवालही आता व्यक्त होत आहे.
31 मे 2021 रोजी तीन महिन्यापूर्वी निवेदन देऊनही या निवेदन आकडेही दुर्लक्ष पोलीस विभागाने केले आहे. अजून या अवैध दारू धंदामुळे पोलिसांना किती जणांचे बळी घ्यायचे आहेत असा सवाल आता व्यक्त होत आहे .अवैध दारू धंदा आणि पोलिसांचे साटेलोटे आहेत का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
येत्या दोन दिवसात जर का या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्यास गावस्तरावर संपूर्ण गावातील महिला, ग्रामस्थ, तरुणाई रविवारी 25 जुलै रोजी रस्ता आंदोलन उभारतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य तारकेश वसंत सावंत यांनी दिला आहे. या अवैध दारू धंदा याबाबत जिल्हा पोलिस विभागालाही निवेदन देण्यात आले आहे जिल्हा पोलीस प्रमुख श्री राजेंद्र दाभाडे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने ग्रामस्थांनी केली आहे.