मुंबई
बजाज फायनान्सने 30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत 843 कोटी रुपये इतका निव्वळ नफा कमावला आहे. पण सदरचा नफा 1446 कोटी रुपये इतका राहणार असल्याचा अंदाज याआधी व्यक्त करण्यात आला होता. कंपनीला मागच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 870 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कालावधीत कंपनीने 5920 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 5900 कोटी रुपये महसूल प्राप्त केला होता.









