मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे.कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.
मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी समूहाकडे गेला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर गरबा खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल, असा इशारा दिला आहे.
Previous Articleसातारा : जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. राधाकिशन पवार
Next Article महामार्गावर अपघातात युवक ठार








